Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

​पुण्यात रील्सचा नाद नडला! बुलेटचे फटाके फोडून आणि कोयता फिरवून दहशत माजवणारी टोळी जेरबंद; युनिट ६ गुन्हे शाखेची मोठी कारवाई

Oplus_16908288
[responsivevoice_button voice="Hindi Female"]
Author Image
Written by
Mehboob shaikh

 

​​पुणे (प्रतिनिधी): मेहबूब शेख ​

Advertisement Box

खास बातमी | पुणे शहर   सोशल मीडियावर रील्स बनवून आणि बुलेटचा फटाक्यांसारखा आवाज काढून शहरात कोयत्याचा धाक दाखवणाऱ्यांवर पुणे पोलिसांनी मोठा दणका दिला आहे. गंगानगर परिसरात दहशत पसरवणाऱ्या दोन तरुणांसह एका अल्पवयीन बालकाला पुणे शहर गुन्हे शाखेच्या युनिट-०६ च्या पथकाने फुरसुंगी येथून रंगेहात ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी त्यांच्याकडून १ लोखंडी कोयता आणि १ बुलेट असा एकूण सुमारे २ लाख ७०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
​                 नेमकी घटना काय?
​दिनांक ३० सप्टेंबर २०२६ रोजी युनिट-०६ चे पथक हद्दीत पेट्रोलिंग करत असताना, पोलीस अंमलदार मोरे यांना गुप्त बातमीदाराद्वारे माहिती मिळाली की, काही तरुण गंगानगर परिसरात बुलेटने फटाक्यांचे आवाज काढून आणि हातात कोयता नाचवून दहशत निर्माण करत आहेत.  माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष कदम आणि उपनिरीक्षक आशिष जाधव यांच्या नेतृत्वाखालील टीमने एच.पी. पेट्रोल पंप, फुरसुंगी येथे सापळा रचला आणि तिघांनाही घेराव घालून ताब्यात घेतले.
​                ताब्यात घेतलेले आरोपी
​नागेश अशोक जाधव (वय १९ वर्षे, रा. सिद्धिविनायक कॉलनी, गंगानगर, पुणे)
​हनुमान शिवाजी शिसोदे (वय २१ वर्षे, रा. सिद्धिविनायक कॉलनी, गंगानगर, पुणे)
​एक विधीसंघर्षग्रस्त (अल्पवयीन) बालक
​पोलिस प्रतिबंधात्मक आदेशाचा भंग
​पुणे शहर पोलीस उप-आयुक्त (विशेष शाखा) यांच्या आदेशानुसार शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी घातक शस्त्रे बाळगण्यास सक्त मनाई आहे (मुं. पो. अधि. कलम ३७ (१)(२)(३)). आरोपींनी या आदेशाचे थेट उल्लंघन करत, बेकायदेशीरपणे लोखंडी कोयता बाळगून सोशल मीडियासाठी रील्स बनवली व नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले.  या प्रकरणी फुरसुंगी पोलीस ठाण्यात गु. र. नं. ४४३/२०२६ अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम ४ (२५) आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(२)(३) सह १३५ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
​तपास व कामगिरी करणारे अधिकारी
​सदर यशस्वी कामगिरी अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) श्रीमती तेजस्वी सातपुते, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्री. गौहर हसन आणि सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-२) श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
​कारवाई पथक: वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष शेटे, सहा. पो. नि. संतोष कदम, पो. उप. नि. आशिष जाधव, पोलीस अंमलदार सस्ते, वणवे, तानाजी देशमुख, कांबळे, बांदल, कर्णवर, राठोड आणि महिला पोलीस अंमलदार लोखंडे (युनिट ०६, गुन्हे शाखा, पुणे शहर).
​           पोलिस मिरर न्यूज’चे आवाहन:
सोशल मीडियावर रील्सच्या माध्यमातून दहशत निर्माण करणे किंवा अवैध शस्त्र बाळगणे हा गंभीर गुन्ह्याची श्रेणी मानला जातो. अशा समाजविघातक कृत्यांवर पुणे पोलिसांची करडी नजर आहे.

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज फोकस में

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा
आज फोकस में

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा

आज का राशिफल

वोट करें

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

Advertisement Box
Advertisement Box

और भी पढ़ें

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द

WhatsApp