Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर पहाटेचा ‘थरार’ पोलीसांचा ‘प्रहार’ कानिफनाथ घाटातील ०३ लुटारूंच्या १२ तासाचे आत फुरसुंगी पोलीस तपास पथकाने आवळल्या मुसक्या

[responsivevoice_button voice="Hindi Female"]
Author Image
Written by
Mehboob shaikh

पुणे / फिरोज शेख

दिनांक ११/०६/२०२६ रोजी पहाटे ०४:३० वाजताच्या सुमारास फिर्यादी व त्याचा मित्र आकाश, अथर्व व मैत्रीण खुशी असे त्याचेंकडील दोन अॅक्टीवा दुचाकी वरुन कानीफनाथ मंदीर ता. पुरंदर जि. पुणे येथे सिटी व्हीव पॉईंट जवळ आले असता स्प्लेंडर मो.सा. वरुन आलेल्या तिन अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचे मित्रांना रस्त्यामध्ये आडवुन हाताने व दगडाने मारहाण करुन जबरदस्तीने फिर्यादी व त्यांचा मित्र आकाश कडील असे १५,००० रु. किमतीचे दोन मोबाईल हँडसेट व ऑनलाईन घेतलेली १३,३०० रक्कम घेवुन पळुन गेले आहेत. म्हणून फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन फुरसुंगी पो.स्टे. येथे गु.र.नं. २५१/२०२६ भा.न्या. सहिता-२०२३ चेकलम ३०९(६), ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.

Advertisement Box

सदरचा गुन्हा हा गंभीर स्वरुपाचा असल्याने अमोल मोरे, वरीष्ठ पोलीस निरीक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन पुणे शहर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन फिर्यादीमध्ये दिलेल्या वर्णनाचे अनोळखी तीन इसम व गुन्हा करण्यासाठी वापरलेली स्प्लेंडर मोटारसायकलचा शोध घेण्यासाठी रवाना केले, पोलीस पथकाने गोपनिय माहितीचा प्रभावी वापर करून पाहिजे आरोपी त्यापैकी १) उंच, साडपातळ, दाढी वाढलेली, कानात बाळी, टी शर्ट व ट्रॅक पॅन्ट परिधान असलेला, २) थोडा जाडसर असलेला, ३) इतर एक याचा शोध घेत असताना पो.अं. ७९४० कामथे, पो. हवा ६४९३ वणवे यांचे गोपनिय बातमीदाराकडून प्राप्त माहितीप्रमाणे तसेच आरोपींचे मिळालेल्या मोबाईल नंबरचे पोहवा श्रीनाथ जाधव यांचे तांत्रिक विश्लेषणावरुन आरोपी हे कानिफनाथ पायथा, बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे येथे असल्याची माहिती प्राप्त झाली. मा. वरिष्ठांचे आदेशाने तपास पथकाने संशयीतांचा कानिफनाथ पायथा, बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे येथे शोध घेतला असता वरील वर्णनाचे इसम नामे १) प्रतिक दिलीप फडतरे, वय २२ वर्षे, धंदा रसवंतीगृह, राहणार- मु.पो. बोपगाव, ता. पुरंदर, जि. पुणे. २) ओंकार सुनिल फडतरे, वय २७ वर्षे, धंदा शेती, रा. सदर, ३) गणेश नवनाथ कामठे, वय २७ वर्षे, धंदा शेती, रा. चांबळी, चिलवाळी वस्ती, ता. पुरंदर, जि. पुणे असे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे गुन्हयाच्या अनुशंगाने तपास केला असता त्यांनी गुन्हा केला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींना गुन्हयात अटक करण्यात येवून मे. कोर्टाकडून पोलीस कस्टडी घेण्यात आली असून त्यांचेकडे केले तपासामध्ये गुन्हयात वापरलेली मो.सा. व मोबाईल असा एकुण ५५,०००/- रु. किं. चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

सदरची कामगिरी मा. जिवन बेनीवाल, पोलीस उपआयुक्त परि.-०६, पुणे शहर, मा. अनुराधा उदमले मॅडम, सहा. पोलीस आयुक्त, लोणीकाळभोर विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली व मा. अमोल मोरे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक, फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर राजेश खांडे पोलीस निरीक्षक (गुन्हे) यांचे सुचनेप्रमाणे तपास पथकातील पोलीस उप. निरीक्षक विनोद पवार, पोलीस उप निरीक्षक बापुसाहेब खंदारे, सहा.पो.फौ.कदम, पोलीस हवा. नितीन गायकवाड, श्रीनाथ जाधव, सागर वणवे, पो. अंमलदार हेमंत कामथे, योगेश गायकवाड, गणेश शिंदे सर्व नेमणुक फुरसुंगी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांनी प्रशंसनीय कामगिरी केली आहे.

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज फोकस में

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा
आज फोकस में

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा

आज का राशिफल

वोट करें

आमिर की अगली फिल्म 'सितारे जमीन पर' का ट्रेलर हाल ही में रिलीज हुआ। क्या यह फिल्म आमिर को बॉक्स ऑफिस पर सफलता दिला पाएगी?

Advertisement Box
Advertisement Box

और भी पढ़ें

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द

WhatsApp