
पोलिस मिरर न्यूज मुख्य संपादक : मेहबूब शेख
पुणे शहर : हडपसर परिसरातील सम्राट गार्डन सोसायटीमध्ये झालेल्या मोठ्या घरफोडीच्या गुन्ह्याचा हडपसर पोलिसांनी अत्यंत तपासाची गती राखत अवघ्या २४ तासांत छडा लावला आहे. या प्रकरणी उत्तर प्रदेशातील एका १८ वर्षीय आरोपीला बेड्या ठोकून त्याच्याकडून साडेतीन लाख रुपयांचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
नक्की काय घडली होती घटना?
दिनांक ०३ जुलै २०२६ रोजी रात्री ८:०० वाजेपासून ते दि. २३ जुलै २०२६ रोजी सकाळी ९:३० वाजेच्या दरम्यान सम्राट गार्डन सोसायटीतील एका बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने अनाधिकृतपणे प्रवेश केला. फ्लॅटच्या बेडरूममधील कपाटाचे लॉकर तोडून आत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला होता. याप्रकरणी फिर्यादींच्या तक्रारीवरून हडपसर पोलिस ठाण्यात गु.र.नं ४९२/२०२०६ भा.न्या.सं.क. ३०५ (अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सीसीटीव्ही अन् गुप्त बातमीदाराच्या जाळ्यात अडकला आरोपी
गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील आणि तपास पथकाने परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून पाहणी सुरू केली.
दरम्यान, तपास पथकातील अंमलदार कुंडलिक केसकर, तुकाराम झुंजार व महावीर लोंढे यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून महत्त्वपूर्ण माहिती मिळाली. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी हा फैजल इसरार खान (वय १८ वर्षे, रा. मु. ढकाई, पो. मगदुमपुर ढोकसहा, जि. कोशांबी, उत्तर प्रदेश) हा सध्या माळवाडी, हडपसर येथील यश हॉस्पिटलजवळ थांबला असल्याची पक्की बातमी पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच सपोनि विजय पाटील यांनी तात्काळ वरिष्ठांना कळवून आदेशानुसार यश हॉस्पिटल परिसरात सापळा रचला व आरोपी फैजल खान यास ताब्यात घेतले. पोलिसांनी पोलिसी हिसका दाखवून सखोल चौकशी केली असता त्याने या घरफोडीची कबुली दिली.
३,५०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त
अटक करण्यात आलेल्या आरोपीच्या ताब्यातून पोलिसांनी एकूण २३ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत:
- १६ ग्रॅम सोन्याची साखळी (चैन)
- ०६ ग्रॅम सोन्याची साखळी (चैन)
- ०१ ग्रॅम सोन्याची रिंग
असा एकूण ३,५०,०००/- रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
या पथकाने केली उल्लेखनीय कामगिरी:
ही धडक कारवाई पोलिस उप-आयुक्त (परिमंडळ ६) श्री. जीवन बेनिवाल, सहाय्यक पोलिस आयुक्त (हडपसर विभाग) श्री. अतुलकुमार नवगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली, हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. हेमंत पाटील व पोलिस निरीक्षक (गुन्हे) श्री. निलेश जगदाळे यांच्या सूचनेनुसार: तपास पथकाचे : सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील, पोलिस अंमलदार दीपक कांबळे, निलेश किरवे, भाऊसाहेब कटके, विजय कानेकर, अजित मदने, कुंडलिक केसकर, भगवान हंबर्डे, अनिरुद्ध सोनवणे, महेश चव्हाण, तुकाराम झुंजार, आकाश धावडे, धीरज शेलार, महावीर लोंढे व कृष्णा घोळवे यांच्या पथकाने केली आहे.
सदर गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय पाटील हे करत आहेत.


हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या">








