Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

सोशल मीडियावर मैत्रिणीच्या जाळ्यात ‘चोर-मित्र’; घरून साडेचौदा लाखांचा ऐवज लांबवणाऱ्या भामट्याला कोंढवा पोलिसांकडून गुजरातमध्ये बेड्या!

Oplus_16908288
[responsivevoice_button voice="Hindi Female"]
Author Image
Written by
Mehboob shaikh

विशेष बातमी 

पुणे शहर ​ :  १४.३९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत; तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांची शिताफीने कारवाई

Advertisement Box

पुणे (प्रतिनिधी):

सोशल मीडिया अ‍ॅपवरून ओळख करून, विश्वास संपादन करत मैत्रिणीच्या घरातील रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून पोबारा करणाऱ्या एका सराईत भामट्याला कोंढवा पोलिसांच्या तपास पथकाने गुजरात राज्यातील वडोदरा येथून शिताफीने अटक केली आहे. आरोपीकडून चोरीस गेलेला १६ तोळे सोन्याचे दागिने असा एकूण १४,३९,४९६/- रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

नेमकी घटना काय?

​दिनांक २५/०६/२०२६ रोजी तक्रारदार (फिर्यादी) महिला या कोंढवा खुर्द येथील आपल्या घरी असताना, त्यांची सोशल मीडियावर ओळख झालेला मित्र यश हा त्यांना भेटण्यासाठी घरी आला होता. दरम्यान, फिर्यादी महिला त्याच सोसायटीत राहणाऱ्या त्यांच्या मावशीच्या घरी जेवणाचा डबा देण्यासाठी गेल्या. ​घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपी यश याने बेडरूममधील कपाटातील २४,०००/- रुपये रोख आणि सोन्याचे दागिने असा एकूण १४,६३,४९६/- रुपये किंमतीचा ऐवज चोरून पलायन केले. याप्रकरणी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ४९४/२०२६, भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

वडोदरा (गुजरात) येथून आरोपीला ठोकल्या बेड्या

​गुन्हा दाखल झाल्यानंतर कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी व तपास पथकाने तात्काळ तपासाची चक्रे हलवली. तपास पथकातील पोलीस अंमलदार केशव हिरवे यांनी केलेल्या अत्यंत बारकाईच्या तांत्रिक विश्लेषणावरून (Technical Analysis) आरोपी गुजरात राज्यातील वडोदरा येथे असल्याचे निष्पन्न झाले. या माहितीच्या आधारे तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे, पोलीस अंमलदार अमोल हिरवे, राहुल रासगे आणि केशव हिरवे यांनी तात्काळ गुजरात गाठले. वडोदरा येथील गोरवा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुभानपुरा, आयपीसीएल रोड परिसर येथे पाळत ठेवून पोलिसांनी आरोपीला शिताफीने ताब्यात घेतले. त्याची विचारपूस केली असता त्याने आपले नाव यश कैलास भुलचंदानी (वय २४ वर्षे, रा. गाव मोहाडी, तहसील बीजापूर, जिल्हा म्हैसाणा, राज्य गुजरात) असे सांगितले. सखोल चौकशीत त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून, त्याच्याकडून चोरीस गेलेले १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

पोलीस पथकाची धडक कारवाई

​सदरची कामगिरी मा. पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ ५) श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (वानवडी विभाग) श्री. रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली: ​वरिष्ठ पोलीस निरीक्षक: श्री. संतोष खेतमाळस पोलीस निरीक्षक (गुन्हे): श्री. प्रशांत मंडले तपास पथक अधिकारी: पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे. अंमलदार: अमोल हिरवे, रविंद्र चिप्पा, विशाल मेमाणे, राहुल शितोळे, केशव हिरवे, राहुल रासगे, पुष्पेंद्र चव्हाण, अमित सुर्यवंशी, संतोष बनसुडे, रियाज पटेल, राहुल शेलार, रशिद शेख, सुरज शुक्ला, शाहिद रजपुत, आणि ओंकार शेटे. यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली आहे. कोंढवा पोलिसांच्या या जलद आणि धडक कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.

पोलीस मिरर आवाहन: सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींवर सहजासहजी विश्वास ठेवू नका. वैयक्तिक माहिती शेअर करणे किंवा त्यांना थेट घरी बोलावणे धोक्याचे ठरू शकते.

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
आज फोकस में

हडपसर पोलिसांचा दणका! सम्राट गार्डन सोसायटीतील घरफोडीचा अवघ्या २४ तासांत छडा; उत्तर प्रदेशातील चोरट्याला ठोकल्या बेड्या

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला
आज फोकस में

प्रधानमंत्री मोदी की अध्यक्षता में बुलाई गई कैबिनेट की बैठक में सरकार ने जाति-जनगणना कराने का लिया फैसला

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल
आज फोकस में

“रहीम चाचा अब अरब सागर में मिलेंगे ” पाकिस्तान को बाढ़ में बहाने का खान सर का यह आइडिया सोशल मीडिया पर वायरल

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया
आज फोकस में

बिलावल भुट्टो द्वारा सिंधु नदी और भारत को लेकर दिए गए बयान पर भारत के केंद्रीय मंत्रियों की कड़ी प्रतिक्रिया

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट
आज फोकस में

पहलगाम अतंकी हमले के बाद पीएम मोदी के बिहार दौर से पूर्व बिहार में जारी किया गया हाई अलर्ट

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा
आज फोकस में

पाकिस्तान के साथ तनाव के बीच रूस जाएंगे अजीत डोभाल, S400 को लेकर होगी जरूरी मीटिंग; जानिए कितना अहम है दौरा

आज का राशिफल

वोट करें

अमेरिकी राष्ट्रपति डोनाल्ड ट्रंप ने एपल प्रमुख टिम कुक से आईफोन का निर्माण भारत में न करने को कहा है। क्या इसका असर देश के स्मार्टफोन उद्योग पर पड़ सकता है?

Advertisement Box
Advertisement Box

और भी पढ़ें

सिंहगड रोड पोलीस स्टेशन, पुणे शहर सिंहगड रोड पोलीस स्टेशन हद्दितील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार अमन अंबीर झारेकरी यास एम.पी.डी.ए. कायद्यान्वये ०१ वर्षाकरिता केले नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे स्थानबध्द

WhatsApp