
पुणे / फिरोज शेख
दि.१२/६/२०२६ रोजी गुन्हे शाखा युनिट २ कडील पोलीस अधिकारी व पोलीस अमंलदार परि-०२ हददीत गुन्हे प्रतिबंध गस्त व रेकार्डवरील पाहिजे आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार उज्वल मोकाशी व शिवानंद कायगुडे यांना गुप्त बातमी मिळाली की, आंबेगाव पोलीस स्टेशन गुरनं १५८/२०२६ आर्म अॅक्ट ३ (२५) व महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) सह १३५ या गुन्हयामधील पाहिजे आरोपी नामे अजित सागर कसबे हा स्वामी नारायण मंदिराजवळ सर्व्हिस रोडवर थांबलेला आहे. सदरची बातमी युनिट प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप यांना कळविली असता त्यांनी कायदेशीर कारवाई करणेबाबत आदेशीत केले.
युनिट २ पथकाने मिळालेल्या बातमीचे अनुषंगाने स्वामी नारायण मंदिराजवळ सर्व्हिस रोडवरुन पाहिजे आरोपीस ताब्यात घेतले. त्यास त्याचे नाव पत्ता विचारला असता त्याने त्याचे नाव अजित सागर कसबे वय २२ वर्ष रा राजीव गांधी वसाहत, चव्हाणनगर धनकवडी पुणे असे सांगीतले. सदर रेकार्डवरील आरोपीवर खालीलप्रमाणे गुन्हे दाखल आहेत. सहकारनगर पो. स्टे गुरनं ३४४/२०२४ बीएनएस कलम१८९ (१), १९१(२), १९०,३२४, आर्म एक्ट ४ (२५), म. पो. का ३७ (१) (२) (३) सह १३५, सहकारनगर पो. स्टे गुरनं ४२६/२०२५ बीएनएसकलम १८९(२),३५२, आर्म एक्ट ४(२५), म.पो.का ३७(१) (३) सह १३५, पर्वती पो स्टेगुरनं ६८/२०२६ आर्म एक्ट ३(२५), म.पो.का ३७ (१) सह १३५, सदर आरोपीस आंबेगाव पोलीस स्टेशन येथे हजर करण्यात आले असून त्यास गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपी हा अभिलेखावरील रेकार्डवरील गुन्हेगार आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्रीमती तेजस्वी सातपुते, मा. पोलीस उप आयुक्त गुन्हे श्री. गोहर हसन, मा. सहा. पोलीस आयुक्त श्री. शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, पो उप-निरी ज्ञानेश्वर दवळी, पोलीस अंमलदार, उज्वल मोकाशी, शिवानंद कायगुडे, सर्जेराव सरगर, संजय टकले शंकर कुंभार, साधना ताम्हाणे, शंकर नेवसे, योगेश मांढरे, नागनाथ राख, विजयकुमार पवार, शिवानंद कायगुडे, सददाम तांबोळी, अजीम शेख, विदया शिंदे, योगेश मांढरे, विनोद चव्हाण, संजय आबनावे, विशाल दळवी, संदिप शिर्के, ओमकार कुंभार, रुषिकेश व्यवहारे व विनायक वगारे या पथकाने केली.










