
संपादक पुणे जिल्हा .फिरोज शेख
दि. २९/०७/२०२५ रोजी पोलीस अंमलदार अनिकेत बाबर, युनिट १ गुन्हे शाखा, पुणे शहर यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, इसम नामे जितु रवि मंडलिक हा जुना मोटर स्टॅन्ड, भवानीपेठ पुणे या ठिकाणी अग्निशस्त्र घेवुन काहीतरी गंभीर गुन्हा करण्याचे उद्देशाने थांबलेला आहे. अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने सदरची बातमी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. कुमार घाडगे, युनिट – १, गुन्हे शाखा यांना कळवली असता त्यांनी सदर ठिकाणी पोलीस स्टाफसह जावुन मिळालेल्या बातमीची खात्री करुन कायदेशीर कारवाई करण्याच्या मार्गदर्शक सुचना दिल्या.
बातमी प्रमाणे जुना मोटर स्टॅन्ड, मटण मार्केट जवळ भवानी पेठ पुणे येथे संशयास्पदरीत्या एक इसम उभा असलेला दिसला. सदर इसम हा बातमीतील नमुद वर्णनाचा असल्याची खात्री होताच त्यास ताब्यात घेवुन नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव जितु रवि मंडलिक वय २० वर्षे रा. द साईट अपार्टमेंट, तिसरा मजला फ्लॅट नं. ३०३, काकडे वस्ती कोंढवा पुणे असे असल्याचे सांगीतले. त्याची अंगझडती घेतली असता त्याने अंगात घातलेले पॅन्टचे आतील बाजुस कंबरेजवळ एक ४०,००० /- रु.किं.चे लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे पिस्टल व त्याचे पॅन्टच्या खिशात ६,००० /- रु. किं.चे एकुण ०६ जिवंत काडतुस मिळुन आले. सदर आरोपी विरुद्ध खडक पोलीस स्टेशन येथे गु.र.नं.३९७ / २०२५ आर्म अॅक्ट कलम ३, (२५) व महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ३७ (१) (२) (३) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे श्री. पंकज देशमुख, मा. पोलीस उपआयुक्त, गुन्हे, पुणे शहर श्री. निखील पिंगळे, मा. सहाय्यक पोलीस आयुक्त, गुन्हे – १, पुणे शहर श्री. राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री कुमार घाडगे, सपोनि दिपक बर्गे, पोलीस अंमलदार राहुल मखरे, अनिकेत बाबर, शशिकांत दरेकर, निलेश साबळे, शुभम देसाई, उमेश मठपती यांनी केली आहे.