
दि २२/८/२५ संपादक पुणे जिल्हा : फिरोज शेख
बंडगार्डन पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पथकाचे अधिकारी स्वप्नील लोहार, पोलीस अंमलदार निलेश पालवे, प्रविण पाडाळे यांनी बंडगार्डन पोलीस ठाणे हद्दीत हरवलेल्या मोबाईल फोनचा डेटा तयार करुन त्याबाबत तांत्रीक तपास करुन/पाठपुरावा करुन नागरिकांचे हरवलेले ५ लाख ९१ हजार रुपये किंमतीचे एकुण ५० मोबाईल फोन हस्तगत करण्यात यश मिळाले आहे. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल फोन संबधीत तक्रारदार यांना बंडगार्डन पोलीस स्टेशन येथे परीमंडळ ०२ चे पोलीस उप-आयुक्त श्री. मिलींद मोहिते यांचे हस्ते परत करण्यात आले. सदरचे मोबाईल फोन परत मिळाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त करुन पोलीसांचे आभार व्यक्त केले आहेत.
सदरची कामगिरी, मा. अप्पर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री. राजेंद्र बनसोडे,मा.पोलीस उप-आयुक्त परिमंडळ २, श्री. मिलिंद मोहिते, मा. सहा. पोलीस आयुक्त लष्कर विभाग. श्रीमती संगिता शिंदे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. रविंद्र गायकवाड, पोलीस निरिक्षक (गुन्हे) निलकंठ जगताप, पोलीस निरीक्षक (गुन्हे) संपतराव राऊत यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप-निरीक्षक स्वप्नील लोहार, निलेश पालवे, शशिकांत खाडे, महेश साळुंखे, प्रविण पाडाळे, महेश जाधव, यांचे पथकाने केली आहे.